Monday, July 28, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : प्रभागनिहाय प्रारुप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यासाठी मुदतवाढ

कोल्हापूर : प्रभागनिहाय प्रारुप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यासाठी मुदतवाढ

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. नव्या निवडणूक कार्यक्रमानुसार आता 23 जून रोजी प्रारुप मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. 1 जुलैपर्यंत त्यावर हरकतींची मुदत असेल. 9 जुलै रोजी अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध होणार आहेत. सुमारे साडेचार लाखांवर मतदार आहेत.

दरम्यान, जुन्या कार्यक्रमानुसार 17 जूनपर्यंत मतदारयाद्या प्रसिद्ध करायच्या होत्या. परंतु, महापालिकेकडून अद्याप मतदारयाद्यांचे काम पूर्ण झालेले नाही. परिणामी, प्रशासनाने मतदारयाद्यांसाठी निवडणूक आयोगाकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार आयोगाने मुदतवाढ दिली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर धामधूम सुरु झाली आहे. पहिल्यांदाच त्रिसदस्यीय प्रभाग रचना पद्धतीने निवडणूक होत आहे. त्यानुसार 92 नगरसेवकांसाठी 31 प्रभाग करण्यात आले आहेत. प्रत्येकी तीन नगरसेवकांचे 30 प्रभाग आणि दोन नगरसेवकांचा 1 असे प्रभाग असणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -