Monday, July 28, 2025
Homeसांगलीमिरजेत विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

मिरजेत विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

मिरज शहरात एका महिलेला शिवीगाळ करुन तिचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी सुधाकर उर्फ पिंट्या शंकर भोसले याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुधाकर भोसले याने बुधवारी सकाळी पीडितेच्या घरात घुसून अश्लील शिवीगाळ करून दमदाटी केली.

त्यानंतर भोसले याने पीडितेचा विनयभंग केला. त्यानंतर पीडितेच्या मुलाला ‘तुला ठेवतच नाही, तुझ्या भावाला कसे खपवले, तसे तुला पण खपवून टाकतो. तुम्हाला ठेवतच नाही. कोणाला आणायचे आहे, त्यांना घेऊन या, असे म्हणून शिवीगाळ केली असल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -