Monday, July 28, 2025
Homeकोल्हापूर४ लाखाचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

४ लाखाचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

ताजी बातमी ऑनलाईन टीम

तावडे हॉटेल परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अलिशान कारमधून बेकायदेशीररित्या वाहतूक होणारे गोवा बनावटीचे मद्य जप्त केले. यावेळी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून ४ लाखाचे मद्य व अलिशान कार असा सुमारे १७ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.



राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करणारी अलिशान कार येणार असल्याची माहिती राज्य उत्पादनचे विभागीय अधीक्षक रवींद्र आवळे यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री निरीक्षक पी. आर. पाटील, गिरीशकुमार कच्चे, विजय नाईक, सचिन काळेल, राजेंद्र कोळी, जय शिनगारे यांनी सापळा रचून कार पकडली. यामध्ये संशयित योगेश धनाजी गायकवाड (वय ३०, रा. क्रांतिनगर, मोहोळ, सोलापूर), विनोद उदय पाटकर (वय ३०, रा. कुरुल, सोलापूर) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून विविध ब्रैडचे गोवा बनावटीचे १८० मिलीचे ५० बॉक्स जप्त केले. कार व मद्य असा १७ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -