Sunday, July 6, 2025
Homeराजकीय घडामोडी'त्या' 34 आमदारांवर सदस्यत्त्व रद्दची कारवाईची सेनेची मागणी, 46 पानांची याचिका

‘त्या’ 34 आमदारांवर सदस्यत्त्व रद्दची कारवाईची सेनेची मागणी, 46 पानांची याचिका

शिवसेनेचे दिग्गज नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 46 आमदारांना सोबत घेऊन बंडाळी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनाच काय तर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi Sarkar) देखील संकटात सापडलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांचे सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे.एकनाथ शिंदे आज 46 आमदारांसह उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे पत्र देऊ शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटविरुद्ध एकनाथ शिंदे गट असा संघर्ष पेटला आहे. परंतु शिवसेना शेवटच्या क्षणी बाजी पलटवू शकते, अशी भीती एकनाथ शिंदे आणि भाजप आहे. त्यामुळे त्यांनी आधीच प्लान बी तयार करून ठेवला आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेच एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागून सूत्र हलवत असल्याची माहिती आहे. भाजप यावेळी कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही.

दुसरीकडे, शिवसेनेने देखील मोठी खेळी केली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र दिलं आहे.विधानसभेच्या विधिमंडळ बैठकीस गैरहजर राहाणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र शिवसेना नवनियुक्त गटनेते अजय चौधरी यांनी दिले आहे.

महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आज चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर येत्या काही दिवसांत सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात. त्यामुळे पुढील चर्चा गुवाहाटी आणि दिल्लीतून होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांसाठी सर्व सुविधा पुरवण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. अजित पवार यांनी फक्त मुंबईमधील परिस्थिती पाहून वक्तव्य केलेलं असावं. त्यांना राज्याबाहेरची परिस्थिती माहिती नाही. ती आम्हाला माहीत आहे, असे देखील पवारांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय त्सुनामी आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार संकटात सापडलं आहे. यामुळे आज दिवसभरात नक्की काय घडामोडी घडतात, ठाकरे सरकार पडणार की तरणार, अशा अशा चर्चांना अक्षरशः ऊत आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -