ताजी बातमी ऑनलाईन टीम
शालेय पोषण आहार प्रकरणाची शिक्षण विभागाकडून कसून चौकशी सुरू झाली आहे. शनिवारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत फाटक यांच्या पथकाने कबनूर हायस्कूल येथे भेट देऊन मुख्याध्यापकांचे जबाब नोंदवून दफ्तर ताब्यात घेतले आहे. मात्र, पोषण आहार नेमका कोणत्या शाळेतील आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नसून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.
शुक्रवारी दुपारी वाहतूक पोलिसांनी कडधान्य घेऊन जाणारा टेम्पो पकडला होता.
कबनुरातील एका हायस्कूलमधून धान्य घेऊन हा टेम्पो काळ्या बाजाराने खासगी दुकानात विक्रीसाठी जात असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करीत पोलिसांनी शिक्षण विभागास कळवले होते. त्यानुसार आज सकाळी शिक्षणाधिकारी फाटक, केंद्र समन्वयक इम्तियाजम्हैशाळे, महादेव गायकवाड यांनी कबनूर हायस्कूलला भेट दिली. स्टॉक तपासून कागदपत्रे सादर केली. तर मुख्याध्यापक पी. डी. चौगले, तत्कालीन मुख्याध्यापक एस. एन. पाटील यांचे जबाब नोंदवले. शहर वाहतक शाखा पोलिसांना रात्री उशिरा अहवाल सादर
केला.
इचलकरंजी ; शालेय पोषण आहार प्रकरणाची कसून चौकशी ; अद्याप गुन्हा दारवल नाही
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -