ताजी बातमी ऑनलाईन टीम
प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफीवर आज मध्य प्रदेशच्या संघाने आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात चौथ्या दिवशी सामन्यावरील पकड मजबूत करणाऱ्या मध्य प्रदेशसमोर १०८ धावांचे लक्ष्य होते. त्यांनी ६ गडी गमावत हे लक्ष्य साध्य केले आणि रणजी ट्रॉफीवर प्रथमच आपल्या नावाची मोहर उमटली. ४१ वेळा (Ranji Trophy ) रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
Ranji Trophy : पहिल्या डावात मुंबईची दमदार कामगिरी
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईची सुरुवात धमाकेदार झाली होती. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि यशस्वी जायस्वाल यांच्या जोडीने नाबाद ८७ धाव केल्या. शॉ ४७ धावांवर बाद झाला. यानंतर मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत विकेट घेणे सुरुच ठेवले. यशस्वी जायस्वाल याने ७८ तर सरफराज खान याने १३४ धावांची खेळीच्या जोरावर पहिल्या डावात मुंबईच्या संघाने ३७४ धावा केल्या.