राज्यात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या (Maharashtra Politics) पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे (Shiv Sena rebel MLA) नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी फोन केला होता. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांची प्रकृती ठीक नाही. नुकतेच त्याचे ऑपरेशन झाले आहे. रविवारीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते घरी परतले. त्याचवेळी शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दोनदा दूरध्वनीवरून (Eknath Shinde called Raj Thackeray) चर्चा केल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली आणि महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. या वृत्ताला मनसेच्या एका नेत्याने दुजोरा दिला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत जाऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे. हे दोन्ही नेते स्वत:ला ठाकरे घराण्याचा भाग मानतात आणि बाळासाहेबांचा विचार सोबत घेऊन चालतील असे बोलले जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा धागा पकडून हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकतात अशी चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या हिप बोनवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी स्वत: काही दिवसांपूर्वी एक ऑडिओ क्लिप जारी करून माहिती दिली होती. गेल्या काही दिवसांपासून ते मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयात दाखल होते. वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर काल त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे.
दरम्यान राज ठाकरे यांचा पक्ष मनसे आणि शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बंडखोर आमदारांचा गट एकत्र येऊ शकतात अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. हे दोन्ही नेते एकत्र येऊन भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देऊ शकतात अशी देखील चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे.
एक नाथ शिंदे यांनी केले ट्वीट
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमधून उद्धव ठाकरेंना “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना तुरुंगात टाकणारा माणूस छगन भुजबळ यांच्यासोबत सरकारमध्ये बसून तुम्हाला वेदना होत नाहीत का? असा सवाल केला आहे.