Wednesday, August 27, 2025
Homeमहाराष्ट्रया घाटात 100 फूट खोल दटीत पर्यटक कोसळला

या घाटात 100 फूट खोल दटीत पर्यटक कोसळला

महाबळेश्वर तालुक्यातील आंबेनळी घाटात माकडाला खायला देण्याच्या नादात एक पर्यटक 100 फूट दरीमध्ये कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पर्यटकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पावसाने नुकतीच हजेरी लावलेली असून निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. यावेळी महाबळेश्वर, प्रतापगड, पाचगणी परिसरात माकडांची संख्या मोठी आहे. या माकडांना अनेक पर्यटक हौशीने खाण्यासाठी देतात. तर काही माकडे पर्यटकांच्या हातातील खायला हिसकावून पळवितात.

आंबनेळी घाटात एक पर्यटक माकडांना हौशीने खाद्य पदार्थ देत असताना 100 फूट खोल दरीत कोसळला. यावेळी तात्काळ सोबत असलेल्या पर्यटकांनी पोलिस ठाण्याची संपर्क साधला. तेव्हा तातडीने महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्या मदतीने त्वरित मदत पोहोचवून पर्यटकास बाहेर काढले. तसेच जखमी झालेल्या पर्यटकास महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी सातारा येथे हलविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -