Wednesday, August 27, 2025
Homeब्रेकिंगमहागाईचा भडका! एलपीजी गॅस कनेक्शन घेणे महागले, आजपासून नवे दर लागू

महागाईचा भडका! एलपीजी गॅस कनेक्शन घेणे महागले, आजपासून नवे दर लागू

वाढत्या महागाईमुळे (Inflation) हैराण झालेल्या सर्वसामान्य जनतेला आणखी एक मोठा झटका बसला आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस कनेक्शन (LPG Gas Connection) घेणे आजपासून महाग झाले आहे. एलपीजी गॅस कनेक्शनसाठी सिक्योरिटी डिपॉजिटमध्ये (Security Deposit) 1050 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ 28 जून म्हणजेच आजपासून लागू झाल्या आहेत.

नवीन दरांनुसार, आता ग्राहकांना 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी कनेक्शनसाठी 2,550 रुपयांऐवजी 3,600 रुपये मोजावे लागणार आहेत. सिक्युरिटी डिपॉझिटमध्ये 1050 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याआधी तेल विपणन कंपन्यांनी घरगुती एलपीजीन गॅस कनेक्शनसाठी सिक्युरिटी डिपॉझिटमध्ये वाढ केली होती.

47 किलो गॅस कनेक्शन खूप महाग –
याशिवाय 47 किलो गॅस कनेक्शनची सिक्युरिटी डिपॉझिटमध्ये सुद्धा वाढ केली आहे. यापूर्वी 47 किलो गॅस कनेक्शनची किंमत 6,450 रुपये होती. ती आता 7,350 रुपये झाली आहे. म्हणजेच त्याची किंमत 900 रुपयांनी वाढली आहे. याशिवाय, पूर्वी 14.2 किलो गॅस कनेक्शनसाठी 1,450 रुपये मोजावे लागत होते.पण आजपासून 2,200 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून भरावे लागणार आहेत. त्याचबरोबर 5 किलोच्या गॅस कनेक्शनसाठी आता 1,150 रुपये मोजावे लागणार आहेत.

रेग्युलेटरही झाले महाग –
गॅस कनेक्शनसोबतच रेग्युलेटरच्या दरातही वाढ झाली आहे. आता 150 रुपयांना मिळणारा रेग्युलेटर 250 रुपयांना मिळणार आहे. जर रेग्युलेटर तुटला किंवा बिघडला तर तो बदलण्यासाठी तुम्हाला 300 रुपये द्यावे लागतील. झी बिझनेसच्या मते, गॅस कनेक्शनच्या सिक्युरिटी डिपॉझिटमध्ये तब्बल 10 वर्षांनी वाढ करण्यात आली आहे.

घरगुती एलीपीजी कनेक्शनही महागले –
दोन आठवड्यांपूर्वी 16 जून रोजी नवीन एलपीजी कनेक्शन देखील महाग झाले होते. कंपन्यांनी 14.2 किलोच्या सिलेंडरची सिक्युरिटी डिपॉझिटमध्ये 750 रुपयांनी वाढ केली होती. आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी दुसरे गॅस कनेक्शन घेतले तर त्यांनाही वाढीव रक्कम भरावी लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -