भारतीय नौदलत भरतीची (Indian Navy Recritment) तयारी करणाऱ्या 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे. भारतीय नौदलाने 1 जुलैपासून अग्निपथ योजनेअंतर्गत अन्निवीर भरती 2022 साठी नोंदणीची प्रक्रिया (Indian Navy Bharti 2022 Form Online) सुरू केली आहे. नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जुलै नंतर सुरू होईल, तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जुलै आहे.
ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना भारतीय नौदलाच्या परीक्षेत (Indian Navy Jobs) बसायचे आहे ते joinindiannavy.gov.in
या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे 2800 अग्निवीर SSR पदांची भरती केली जाईल. यामध्ये महिलांसाठी 560 जागा आहेत.
नौदलाच्या अग्निवीर SSR 2022 साठी शैक्षणिक पात्रता?
भारतीय नौदल अग्निवीर SSR भरती 2022 (Indian Navy Agniveer SSR Recruitment 2022) परीक्षेत अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. तसेच संगणक विज्ञान, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
भारतीय नौदलाच्या अग्निवीर SSR भरती 2022 साठी आवश्यक उंची?
या भरती परीक्षेसाठी पुरुषांची उंची 157 सेमी आणि महिलांची उंची 152 सेमी असावी.
वयोमर्यादा?
या भरती परीक्षेत बसलेल्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 23 वर्षे आहे.
विवाहित व्यक्ती नौदलात भरतीसाठी अर्ज करू शकतात?
विवाहित व्यक्ती या भरती परीक्षेसाठी अर्ज करू शकत नाहीत. नेव्ही एसएसआर भरतीसाठी केवळ अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
किती दिवसांची रजा मिळेल?
अग्निवीरला नौदलात वर्षभरात 30 दिवसांची रजा दिली जाईल. तसेच सैनिक आजारी पडल्यास इतर सुट्ट्यांचीही तरतूद आहे.
पगार किती असेल?
नौदलात निवड झालेल्या अग्निवीरचा पगार पहिल्या वर्षी 30 हजार, दुसऱ्या वर्षी 33 हजार, तिसऱ्या वर्षी 36 हजार आणि चौथ्या वर्षी 40 हजार रुपये असेल. पगारातील 30 टक्के रक्कम अग्निवीर कॉर्प्स फंडासाठी कापली जाईल. तसेच सेवानिवृत्तीच्या वेळी या निधीत जे काही पैसे जमा होतील ते सरकार व्याजासह अग्निवीरला देईल.
जीवन विमा मिळेल?
अग्निवीरला 48 लाख रुपयांचा जीवन विमा दिला जाईल.
नौदलात चार वर्षे सेवा केल्यानंतर अग्निवीराचे काय होणार?
नौदलात अग्निवीर SSR म्हणून चार वर्षे सेवा केल्यानंतर तो कायमस्वरूपी भरतीसाठी अर्ज करू शकतो. यामध्ये 25 टक्के अग्निवीरांची पुनर्नियुक्ती करण्यात येणार आहे. मात्र ज्यांची नियुक्ती होणार नाही त्यांच्यासाठी 4 वर्षे सेवा केल्यानंतर नोकरी आणि व्यवसायाचे आणखी अनेक मार्ग खुले होतील.
शारीरिक चाचणी कशी असेल?
पुरुष उमेदवारांना 6 मिनिटे 30 सेकंदात 1.6 किमी आणि महिलांना तेच अंतर 8 मिनिटांत धावावे लागेल. पुरुष उमेदवारांसाठी 20 आणि महिला उमेदवारांसाठी 20 उमेदवारांना 20 उठाबशा काढ्याव्या लागतील. पुरुष उमेदवारांना 12 पुश अप आणि महिलांना 10 सिट अप करावे लागतील.