Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगसांगली : तरुणाची स्वतःलाच श्रद्धांजली ! सोशल मीडियावर व्यक्त होत तरुणाची आत्महत्या

सांगली : तरुणाची स्वतःलाच श्रद्धांजली ! सोशल मीडियावर व्यक्त होत तरुणाची आत्महत्या

प्रेम विरहाचा व्हिडिओ मोबाईल व्हाट्सअपवर स्टेटस ठेवत त्यानंतर स्वतःलाच मोबाईलवर श्रद्धांजली वाहून वाळवा येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.वाळवा – खेड रस्त्यावर एका शेतातील गोठ्यात सकाळी ही घटना उघडकीस आली. सुशांत भरत तोडके वय २६ रा. नागठाणे ता.पलूस असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. या संपूर्ण प्रकरणाची आष्टा पोलिसांत नोंद झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत हा एका शेतकऱ्याकडे शेतमजूर म्हणून काम करत होता. ईशान वसंत गावडे यांच्या खोलीत तो भाड्याने राहत होता. सकाळी त्याने गोठ्यात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.मयत सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्या मोबाईलवर व्हाट्सअप स्टेटस ठेवून सकाळी सव्वा सहा वाजता एक प्रेम विरहाचा व्हिडिओ टाकला.त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा त्याच ठिकाणी स्वतःचा फोटो टाकून भावपूर्ण श्रद्धांजली असा उल्लेख केला.आणि त्याने आत्महत्या केली. त्याचे व्हाट्सअप स्टेटस पाहताच त्याच्या कुटुंबियांनी शेतमालकाशी संपर्क साधला. आणि सुशांत कुठे आहे हे बघायला सांगितले. मालकाने त्याचा शोध घेतला असता तो गोठ्यात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.सदर घटनेचा अधिक तपास आष्टा पोलीस हवालदार उदय पाटील करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -