Wednesday, July 30, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : दिवसाढवळ्या चोरी; अडीच लाखाचे सोने लंपास

Kolhapur : दिवसाढवळ्या चोरी; अडीच लाखाचे सोने लंपास

बीडशेड ता. करवीर येथील ओमकार बेकरी येथे सोमवारी सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान चोरट्यांनी बंद घराचे कुलूप काढून चार तोळे दागिने लंपास केले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बीडशेड या करवीर येथे सुनिल जोतीराम दिंडे यांच्या स्वमालकीचे बेकरीचे दुकान आहे. ते आपल्या कुंटूबासमवेत वरील मजल्यावर रहायला आहेत. आषाढीवारीसाठी पंढरपूर दर्शनासाठी सकाळी 7 वा घराला कुलूप लावून सर्व मंडळी बाहेर पडले असता चोरट्यांनी बाहेर ठेवलेल्या चावीच्या आधाराने कुलूप काढून दागिन्यांवर डल्ला मारला. विशेष म्हणजे चोरट्यांनी केवळ सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे. पण चांदीच्या दागिने चोरले नाहीत पोलीस प्रशासनाने तपासणी करणेसाठी श्वानपथकाचे पाचारण केले पण ठराविक अंतरावर पावसामुळे श्वान घुटमळले. चोरटा कोणीतरी माहिती तील असावा असा अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. सदर घटनेचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल सरवडेकर करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -