Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगशिवसेनेला बसणार धक्का, एकनाथ शिंदे गटाच्या गळाला लागले 5 नगरसेवक?

शिवसेनेला बसणार धक्का, एकनाथ शिंदे गटाच्या गळाला लागले 5 नगरसेवक?

विधान परिषदेच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय (Maharashtra Political Crisis) वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या 15 दिवसाच्या या कालावधीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. या घडामोडींचा परिणाम होत राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदेंनी (CM Ekanath Shinde) राज्याचे नवी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला (Shivsena) एकापाठोपाठ धक्के बसतच आहे. अशातच राजकीय वर्तुळातून पुन्हा एका मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी पुण्यातून (Pune City) समोर येत आहे. त्यानुसार पुणे शिवसेनेला खिंडार पडले असून 5 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर आहे.

पुणे महानगर पालिकेत शिवसेनेच्या तिकिटावर तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले नाना भानगिरे हे एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी असणार आहे. त्यांच्यासह 2017 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले पुण्यातील 5 नगरसेवकही एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याची शक्यता आहे. भानगिरे यांनी हडपसर विधानसभा निवडणूक तीन वेळा लढवली आहे.

याबाबात मुख्यमंत्री शिंदे आणि भानगिरे यांची फोनवरून चर्चा झाली असून मंगळवारी सायंकाळी ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता पुण्यातही शिवसेनेत खिंडार पडले असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. नाना भानगिरे व 2017 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले पुण्यातील 5 नगरसेवकही शिंदे यांच्या गटात सामिल होणार असल्याने मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी बंडानंतर भाजपशी हातमिळवणी करत राज्यात भाजप- शिवसेना शिंदे गटाचे सरकार स्थापन केले आहे. अशा परिस्थितीत बंडानंतर पुण्यातील किती शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे यांच्या समर्थनार्थ पुढे येतील हे अद्यापही स्पष्ट नाही. याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर हडपसर भागातील शिवसेनेचे जेष्ठ माजी नगरसेवक नाना भानगिरे यांना थेट मुंबईत बोलावले आहे. यामुळे पुण्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. याचवेळी पुणे शिवसेनेची चिंता देखील वाढली आहे. त्यामुळे येत्या काळात काय घडामोडी घडतात याकडे पुणेकरांचे लक्ष लावून आहे. शिवसेनाही आमदारांच्या बंडानंतर सतर्क झाली असून पक्षातर्फे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -