ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यात सोमवारपासून पावसानं पुन्हा जोर धरला आहे. मुंबई आणि ठाण्यात सोमवारी रात्रभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. दरम्यान हवामान विभागाकडून मुंबईसह उपनगरांना ऑरेंज अलर् जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे.
कोकणात कोसळधार, अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटला… शेतात पाणीच पाणी
– सोमवारपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे. राजापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे.
– जगबुडी आणि काजळी या दोन मोठ्या नद्यांनी काल सोमवारीच इशारा पातळी ओलांडली आहे.
– हवामान खात्याने कोकणात पुढील चार दिवस 8 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
– संततधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत असतानाच एक मोठी दुर्घटना घडली.
– पाचल कोडंवाडी (पवार वाडी) येथे अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटला.
– अर्जुना प्रकल्प परिसरात मागील 24 तासात 326 मिलिमीटर इतका प्रचंड पाऊस झाला
– सदर पावसाचे पाणी डोंगर उतारावरून वाहत उजव्या कालवा मध्ये शिरले आहे.




