Tuesday, November 25, 2025
Homeसांगलीसांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूकीत सफाई कामगार विकास...

सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूकीत सफाई कामगार विकास पॅनेलचा विजय

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अखंड ९ पॅनेल पूर्णपणे विजयी

सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती.आज या पतसंस्था निवडणूकीसाठी सकाळपासून मतदान चालू झाले होते.यामध्ये २ पॅनेल होते,सफाई कामगार विकास पॅनेल तर दुसरे कर्मचारी कामगार पॅनेल हे दोन पॅनेल होते.प्रत्येकी पॅनेल कडून ९ उमेदवार रिंगणात होते.सकाळी ८ ते ४ पर्यंत मतदान झाले आणि ५ वाजता निकाल हाती आला.यामध्ये सफाई कर्मचारी विकास पॅनेल यांचे संपूर्ण पॅनेल विजयी झाले यामध्ये ९ उमेदवार विजयी झाले.यामध्ये विजयी उमेदवार सर्वसाधारण गट मिथून अशोक कांबळे,विशाल मुरलीधर कुदळे,भारत शामराव कोलप,किशोर जगन्नाथ जबडे,नंदकुमार डेव्हिड लोंढे, जगन्नाथ चोखा साबळे,महिला राखीव गट मंगल उत्तम वारे, अनुसुचित जाती कांतीलाल बापू कांबळे, विमुक्त जाती महेश गुराप्पा माकडवाले हे नऊ उमेदवार सफाई कर्मचारी विकास पॅनेल कडून बहुमतांनी निवडून आले.या सफाई कर्मचारी विकास पॅनेलला समर्थ साथ ही निखिल कोलप,महेश खाडे,किरण लोंढे, युवराज कांबळे,सचिन वाघमोडे, सिध्दांत ठोकळे,सौ.मंगल सय्यम,अनिल पाटील,नितीन कांबळे,रवी साबळे,अक्षय कोलप,दिलीप मद्रासी ह्यांनी दिली या़च्या नेतृत्वाखाली संपूर्ण पॅनेल विजयी झाले आहे.तर सफाई कर्मचारी विकास पॅनेलच्या विजयी उमेदवार यांनी बोलताना प्रतिक्रिया दिल्या की आमच्यावर विश्वास ठेवून कर्मचारी मतदारांनी आमचे पॅनेल निवडूण दिले त्याच्या हितासाठी आम्ही सदैव कर्मचाऱ्यांच्या कल्याणाच्या योजना राबवू.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -