सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी आजपासून देशांतर्गत 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1053 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर 5 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किंमतीत 18 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 8.50 रुपयांनी कमी झाल्या आहेत. तर कोलकातामध्ये 8 रुपयांनी दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 3.5 रुपयांनी वाढली होती. तेव्हा एका सिलिंडरची किंमत 1,003 रुपये झाली होती. त्याआधी एलपीजी सिलिंडरची किंमत 999.50 रुपये होती. महिन्याभराआधीच सिलिंडरच्या किमतींनी एक हजार रुपायांच्या आकडा पार केला होता. त्यानंतर आता थेट 50 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे गृहिणिंच्या बजेटवर मोठा परिणाम होणार आहे.




