महाराष्ट्रासह भारतातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान तसेच असलेल्या राज्यातील पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे (Vithhal-Rukmini Live Darshan) दर्शन घेताना अनेक तास वाट पाहण्याची गरज राहणार नाही कारण तुम्ही घरबसल्या लाईव्ह दर्शन आता घेऊ शकणार आहात. वारकरी नेहमीप्रमाणे यावर्षीदेखील पायी दिंडीत जात आहेत, पण इतर भाविकांना जाण्यास शक्य होत नसल्याने लाईव्ह दर्शनाची ही सुविधा जिओ टीव्ही च्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या घेता येणार आहे.
आषाढी तसेच कार्तिकी एकादशीला लोक पंढरपूर येथे दर्शनासाठी जात असतात. लाखो भाविक-भक्त रांगेत उभे राहून आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेत असतात. परंतु सर्वानाच गर्दीमुळे, कोरोना महामारीमुळे किंवा इतर कारणांनी पंढरपूर येथे जाऊन दर्शन घेणे शक्य होत नाही. तमाम भाविकांना सांगण्यास आनंद होतोय की, भाविकांसाठी जिओ (Jio) कंपनीकडून एक खास भेट असणार आहे.
आजकालच्या तरुण पिढीपेक्षा आपले वृद्ध लोक लाडक्या विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी उत्साहित असतात. मग काही कारणांनी त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून आपण वयोवृद्ध तसेच आजारी, अपंग किंवा पंढरपूरला जाऊ न शकलेल्या भाविकांसाठी लाईव्ह दर्शनाची सोय तर करू शकतो. जिओ टीव्ही च्या माध्यमातून लाईव्ह दर्शनाची सोय तुम्ही करू शकता.
कसं घेणार लाईव्ह दर्शन..?
भाविकांनो, आता तुम्ही घरबसल्या 24 तास पांडुरंगाचे लाईव्ह दर्शन घेऊ शकता. मंदिरात चालू असलेले सर्व विधी जसे की, महापूजा, अभिषेक यांसारखे अनेक विधी घरबसल्या पाहू शकणार आहेत. तुम्हाला फक्त जिओ टीव्ही ॲप डाउनलोड करावं लागणार आहे.
जिओ टीव्ही वर लाईव्ह दर्शन घेण्यासाठी गूगल प्ले स्टोअर वर जाऊन Jio TV असं सर्च करा आणि ॲप्लिकेशन डाऊनलोड करा. मग त्यात भाविक Devotional category & Marathi Language मध्ये जाऊन दर्शन घेऊ शकतात. भाविकांना जिओ टीव्ही वर क्यू आर कोड स्कॅन करूनदेखील लाईव्ह दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. जर Jio TV वर ऑनलाईन दर्शन सुविधा बंद झाली किंवा काही तांत्रिक समस्या आली तर आपण गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन ‘श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर’ हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून दर्शन घेऊ शकता.