Wednesday, July 30, 2025
Homeराजकीय घडामोडीदेवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून शिंदेंना भेटायचे, अमृता फडणवीसांचा खुलासा

देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून शिंदेंना भेटायचे, अमृता फडणवीसांचा खुलासा

राज्यात 11 दिवसांच्या सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राज्याचे मुख्यमंत्री बनले आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाले. त्यापूर्वी एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह आधी गुजरातमधील सुरतमध्ये आणि नंतर आसाम येथील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये मुक्कामी होते. या काळात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या (Eknath Shinde-Devendra Fadnavis Meeting) बातम्या समोर येत होत्या. या दोन्ही नेत्यांमध्ये काही भेटी रात्रीच्या वेळेस झाल्याच्याही बातम्या समोर आल्या. मात्र आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी स्वत: या दोन्ही नेत्यांच्या भेटीबाबत (Shinde-Fadnavis Meeting) खुलासा केला आहे.

देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून शिंदेना भेटायला जायचे असा मोठा खुलासा अमृता फडणवीस यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत ‘एबीपी माझा’शी बोलताना अमृता फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याची राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विधिमंडळ अधिवेशनत भाषण करताना याबाबत भाष्य केले होते. राज्याबाहेर असताना सर्व आमदार झोपल्यानंतर मी आणि देवेंद्र फडणवीस भेटायचो आणि ते उठायच्या हात मी हॉटेलवर परतायचो असा खुलासा स्वत: एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले होते. मात्र त्यानंतर शिवेसेनेचे अनेक आमदार त्यांच्यासोबत असल्याचे समोर आले. शिंदे यांच्यासह शिवेसेनेचे 25 ते 30 आमदार सुरुवातीला सुरत येथे एक हॉटेलमध्ये थाबंले होते. त्यांनंतर या शिंदेच्या गटाला शिवसेनेचे आणखी काही आमदार जाऊन मिळाले. परंतु दुसऱ्या दिवशी या आमदारंनी आपला मुक्काम गुवाहाटी येथे हलवला. त्यानंतर शिवसेनेचे एक एक करून जवळपास 39 आमदार शिंदे गटात सहभागी झाले. शिवेसेनेतून एक तृतियांशहून अधिक आमदार फुटल्याने शिंदेनी आपला एक वेगळा गट स्थापन केला आणि भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री बनले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -