Wednesday, July 30, 2025
Homeक्रीडावेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित, हार्दिकला विश्रांती, ‘हा’ खेळाडू असणार...

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित, हार्दिकला विश्रांती, ‘हा’ खेळाडू असणार कॅप्टन…!

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज (ता. 6) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.. इंग्लंडनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे.. येत्या 22 जुलैपासून वेस्ट इंडीज विरुद्ध तीन वन-डे आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे..

कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्ध 3 टी-20, तसेच 3 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.. त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे.. इंग्लंड दौऱ्यानंतर लगेच वेस्ट इंडिज दौरा सुरू होत असल्याने ‘बीसीसीआय’ने भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना पुन्हा एकदा विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे..

वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारताचा नवखा संघ जाणार आहे. या संघाची धुरा भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.. विशेष म्हणजे, इंग्लंड दौऱ्यासाठी शिखर धवनचा भारतीय संघातही समावेश नव्हता. मात्र, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आता त्याला थेट वन-डे संघाचा कर्णधारच करण्यात आले आहे.

 

विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या यांच्यासह जसप्रीत बुमराह यांना निवड समितीने विश्रांती दिलीय. उपकर्णधार म्हणून रवींद्र जाडेजा याची निवड केली आहे. संजू सॅमसन याने टी-20 पाठोपाठ आता वन-डेतही भारतीय संघात पुनरागमन केलंय. तसेच शुभमन गिलचेही संघात आगमन झालं आहे..

भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेट किपर), संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -