Tuesday, July 29, 2025
Homeराजकीय घडामोडीशिवसेनेला आणखी एक मोठा धक्का,आनंदराव अडसूळ यांचा नेतेपदाचा राजीनामा

शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का,आनंदराव अडसूळ यांचा नेतेपदाचा राजीनामा

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (shiv sena former mp anandrao adsul resigned) यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आनंदराव अडसूळ यांचा राजीनामा हा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Udhav thackeray) यांना धक्का मानला जात आहे. आनंदराव अडसूळ हे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाच्या वाटेवर असल्याची देखील चर्चा सुरू आहे.

आनंदराव अडसूळ यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्याचं पत्र पाठवलं आहे. आजारपणात साधा फोनही नाही, तसेच अडचणीच्या काळात पक्ष नेतृत्त्व पाठीशी न राहिल्याच्या भावना आनंदराव अडसूळ यांनी राजीनामा पत्रातून बोलून दाखवल्या आहेत. ED ने केलेली कारवाई, त्याचबरोबर आजारपणात साधी विचारपूस देखील केली नाही, अशी खंत देखील अडसूळ यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आनंदराव अडसूळ यांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देणं टाळलं. मात्र, शिवसेना नेतृत्त्वावर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं स्पष्ट झालं आहे. आता उद्धव ठाकरे हे अडसूळांच्या राजीनामा पत्रावर काय बोलतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मुलगा अभिजीत अडसूळ एकनाथ शिंदेंच्या गटात…
आनंदराव अडसुळ यांचे चिरंजिव अभिजीत अडसूळ हे एकनाथ शिंदे गटासोबत आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळ हे देखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी…
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची अमरावतीच्या सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी ED कडून सध्या चौकशी सुरु आहे. व्यवहारात अनियमितता दिसून आल्यानं ED ने आनंदराव अडसूळ यांच्या घरी छापेमारी केली होती. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. परंतु, अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तरी देखील ED च्या अधिकाऱ्यांनी त्यांचा पिच्छा सोडला नव्हता. ED अधिकारी तब्बल 14 तास हॉस्पिटलबाहेर तळ ठोकून होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -