आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे काल शेअर बाजारात तेजी दिसली तर आज सोन्या-चांदीच्या दरात मात्र घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या मागील काही दिवसांत सोन्याच्या भावात चढ-उतार दिसून येतोय. या यंदा महागाईने डोके चांगलेच वर काढलेले दिसत आहे.
सध्या तरी आठवड्याच्या सुरुवातीस सोमवारी आणि मंगळवारी बाजारात स्थिरता दिसून आली मात्र काल (ता.6 जुलै) सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती. यानंतर आज पुन्हा सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. यामुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार आज खरेदीसाठी उत्साह दाखवणार आहेत.
गुड रिटर्न्स या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,600 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,930 रुपये असून तुमच्या शहरांत आणि या दरात किंचित फरक असू शकतो. आज चांदीचे भाव घसरून ते 10 ग्रॅम चांदीसाठी दर 569 रुपयांवर आले आहेत. (Todays Gold, Silver price Updates)
24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव:
मुंबई – 51,980 रुपये
नागपूर -52,980 रुपये
पुणे -52,480 रुपये
चेन्नई – 51,710 रुपये
दिल्ली – 51,930 रुपये
हैदराबाद – 51,930 रुपये
कोलकत्ता – 51,930 रुपये
लखनऊ – 52,080 रुपये