Saturday, August 2, 2025
Homeब्रेकिंगशिरोळ : उदगावमध्ये विहिरीत बुडालेल्या मुलाचा एनडीआरएफ पथकाकडून शोध

शिरोळ : उदगावमध्ये विहिरीत बुडालेल्या मुलाचा एनडीआरएफ पथकाकडून शोध

जयसिंगपूर : उदगाव (ता.शिरोळ) येथील साखळे माळ्यातील दुसरीत शिकणारा संकेत राजेश बामणे (वय 8) हा गुरुवारी रात्री सातच्या सुमारास विहिरीत पडल्याचा संशय आला. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजलेपासून शोधकार्य सुरू आहे. मात्र शुक्रवारी सकाळी बारा वाजेपर्यंत संकेत मिळून न आल्याने एनडीआरएफसह, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्यासह ७ पथके शोधकार्य करीत आहेत. जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्यासह २० हून अधिक पोलिस कर्मचारीही शोधकार्यात कार्यरत आहेत. दरम्यान या घटनेमुळे विहीर परिसरात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -