Tuesday, July 29, 2025
Homeतंत्रज्ञानमोठा झटका : भारतातील 19 लाखाहून अधिक यूजरचे व्हॉट्सअ‍ॅप खाते बंद

मोठा झटका : भारतातील 19 लाखाहून अधिक यूजरचे व्हॉट्सअ‍ॅप खाते बंद

सध्याच्या काळात इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp हे खूप लोकप्रिय झाले आहे. वापरकर्त्यांचा अनुभव आणखी सुखद बनवण्यासाठी कंपनी नेहमीच नवनवीन फीचर्स जारी करत असते. तर याव्यतिरिक्त अनेक खात्यांवर व्हाट्सअ‍ॅप कारवाई देखील करत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या आताच्या मासिक अहवालानुसार, मे महिन्यात कंपनीने वापरकर्त्यांच्या तक्रारींच्या आधारे भारतातील 19 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली होती. मे महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपवर 528 तक्रारी आल्या असून 24 खात्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या अपीलांपैकी 303, त्यांच्या स्वतःच्या बंदी आणि इतर खाते समर्थन, उत्पादन समर्थन आणि सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे या आवाहलात सांगण्यात आले आहे.

खाते बंद का होतात ?

कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्याने त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणारा, धमकावणारा किंवा त्रास देणारा, द्वेष पसरवणारा किंवा कोणालाही भडकावणारा मजकूर शेअर केला, तर त्याच्या खात्यावर बंदी घालण्यात येते. याशिवाय, जर एखाद्या वापरकर्त्याने कंपनीच्या नियम आणि अटींचे उल्लंघन केले तरीही त्याचे खाते बॅन केले जाऊ शकते.

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपने एप्रिल महिन्यात देखील 16 लाखांहून अधिक भारतीय खाती आणि मार्च महिन्यात 18.05 लाख खाती बंद केली होती. वापरकर्त्यांकडून मिळालेल्या नकारात्मक प्रतिक्रिया लक्षात घेऊन खात्यांवर बंदी घालण्याची ही कारवाई करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -