‘चेन्नई सुपर किंग्स’.. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक… कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ‘चेन्नई सुपर किंग्ज’ने आतापर्यंत चार वेळा ‘आयपीएल’चे विजेतेपद जिंकलंय.. मात्र, धोनीच्या वाढत्या वयाचा विचार करुन चेन्नई संघाने 2022 च्या स्पर्धेत नेतृत्वाची जबाबदारी स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाच्या खांद्यावर दिली होती.
आयपीएलच्या 15व्या हंगामात (IPL-2022) जाडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईची कामगिरी खालावली.. जाडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने 8 पैकी 6 सामने गमावले. संघाच्या खराब कामगिरीमुळे निराश होऊन जाडेजाने स्पर्धा सुरु असतानाच मध्यंतरीच कर्णधारपद सोडले नि नंतर दुखापतीमुळे तो स्पर्धेतूनही बाहेर पडला…त्याला संघाबाहेर केल्याचीही चर्चा होती.
जाडेजा बाहेर पडल्यावर चेन्नई संघाने परत एकदा धोनीच्या (Dhoni) हातात सगळी सूत्रे दिली.. त्यानंतर काही सामन्यात चेन्नईने विजय मिळवला, तरी संघाची कामगिरी काही सुधारली नाही..
जाडेजा-धोनीमधील वाद टोकाला…
जाडेजा व चेन्नईतील हा वाद संपल्याचे बोलले जात होतं.. मात्र, ‘आयपीएल’ झाल्यानंतर 3 महिन्यांनी जाडेजाने मोठा धक्का दिला आहे.. जाडेजाने ‘इन्स्टाग्राम’वरून चेन्नईशी संबंधित सर्व पोस्ट डिलिट केल्या आहेत. विशेष म्हणजे, 7 जुलैला धोनीच्या वाढदिवसाला त्याने शुभेच्छाही दिल्या नाहीत.
याआधी प्रत्येक वाढदिवसाला जाडेजाने धोनीला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे चेन्नई संघ व्यवस्थापनाबरोबरच जाडेजाचे धोनीसोबतही वाजल्याचे बोलले जात आहे.. त्यामुळे जाडेजा पुढील आयपीएल (2023) ‘सीएसके’कडून खेळणार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.. जाडेजा व ‘सीएसके’नेही एकमेकांना ‘इन्स्टाग्राम’वर ‘अनफॉलो’ केले आहे.
‘आयपीएल’मध्ये दुखापत झाल्यानंतर जाडेजा भारतीय संघाकडूनही खेळला नव्हता. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत तो संघात परतला. या कसोटीत त्याने पंतसोबत 222 धावांची भागीदारी केली.. त्याने स्वत: खणखणीत शतक पूर्ण केल्याने तो फाॅर्मात परतल्याचे संकेत मिळत आहेत.
‘एजबेस्टन’ कसोटीत शतक केल्यानंतर तो म्हणाला, की “आयपीएल माझ्या डोक्यात नव्हतं. तुम्ही भारताकडून खेळता, तेव्हा तुमचं पूर्ण लक्ष भारतीय संघावर असलं पाहिजे. भारतासाठी चांगली कामगिरी करण्यापेक्षा दुसरे समाधान नाही..”