Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुर :दुर्देवी घटना! वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नदीत बुडुन मृत्यु

कोल्हापुर :दुर्देवी घटना! वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नदीत बुडुन मृत्यु

कुरुकली येथे भोगावती नदीकिनारी (riverside) वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. संदीप आनंदा पाटील (वय३९) या शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात बुडुन मृत्यु झाला.ही दुर्घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हसुर दुमाला- कुरुकली दरम्यानच्या पडझुंबरा नावाच्या शेतात घडली. रात्री उशिरा मृतदेह मिळून आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,संदीप हा जनावरांना वैरण आणण्यासाठी दुपारी ३ वाजता भोगावती नदीकाठी (riverside) असणाऱ्या पडझुंबरा नावाच्या शेताकडे गेला होता.मात्र सायंकाळ उलटून रात्र झाली तरीही परत आला नसल्याने शोधाशोध सुरु झाली.

त्याचा शोध घेण्यासाठी मित्रमंडळी व नातेवाईक गेले असता पुराच्या पाण्यामध्ये तो बुडाल्याचे दिसुन आले. त्यांला पोहता येत नसल्याने पुरामध्ये बुडुन त्यांचा मृत्यु झाला.रात्री उशिरा त्याचा मृतदेह सापडला आहे.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,दोन मुले,भाऊ असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -