शिवसेनेला पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी संपूर्ण राज्यातील सर्व निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिक पुन्हा एकदा जोमाने एकवटत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि आदेशाने राज्यात पुन्हा एकदा शिवसेनेचा झंझावात पाहावयास मिळणार आहे.यामध्ये राज्यात शिवसेनेचा ताकदवान जिल्हा म्हणून (kolhapur political update) कोल्हापूरची पुन्हा एकदा ओळख करून दाखवू, अशी ग्वाही शिवसेना सहसंपर्कप्रमुख व खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
कोल्हापूर (kolhapur political update) जिह्यातील शिवसैनिकांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, पोपट दांगट, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, माजी आमदार सुरेश साळोखे, अवधुत साळोखे, मंजीत माने, जिल्हा महिला संघटक शुभांगी पवार, स्मिता मांडरे, प्रतिज्ञा उत्तुरे, प्रीती क्षीरसागर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार संजय मंडलिक म्हणाले, केवळ सत्तेसाठी राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मात्र, भाजपकडून केवळ सत्तेसाठी या अडीच वर्षांच्या काळात ईडी, सीबीआय अशा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर शिवसेनेतच फूट पाडून भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली असली, तरी आजही सर्वसामान्य जनतेच्याही हृदयात उद्धव ठाकरे यांच्याविषयी आदराचे स्थान कायम आहे. शिवसेनेत फूट पाडण्याचे कारस्थान कोणी केले आणि कसे झाले, हे आता जगजाहीर झाले आहे. त्यामुळे सर्व जुने शिवसैनिक पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत. जिह्यात शिवसेनेची ध्येय्यधोरणे घरोघरी आणि गावागावात पोहोचवून नव्या जोमाने काम करून शिवसेना अधिक बळकट करणार असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले.
शिवसैनिक पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत. जिह्यात शिवसेनेची ध्येय्यधोरणे घरोघरी आणि गावागावात पोहोचवून नव्या जोमाने काम करून शिवसेना अधिक बळकट करणार असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले. शिवसेना पदाधिकारीयांचा गुरुवारी मेळावा गुरुवारी (दि. 14) सकाळी राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत शहर व दक्षिणमधील शिवसेना पदाधिकारीयांचा मेळावा घेण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले.
राधानगरी-भुदरगड तालुक्याचे आमदार प्रकाश आबिटकर हे बंडखोरांच्या गटात सामील झाल्याने त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी मोर्चा काढून निषेध केला. महिलांनी सुपात बांगडय़ा घालून त्यांच्या कार्यालयावर आहेर दिला. आबिटकर यांच्या या कृत्यावर शिवसैनिकांसह सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. यापुढे राधानगरी येथील बारवे-दिंडेवाडी येथील धरणप्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होऊ देणार नसून, सर्वसामान्य शिवसैनिक व ग्रामस्थांच्या हस्ते धरणप्रकल्पाचे उद्घाटन करणार असल्याचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सांगितले.