Saturday, July 5, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात खासगी शाळेच्या बसचा अपघात

कोल्हापुरात खासगी शाळेच्या बसचा अपघात

विदयार्थ्यांना शाळेला घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला. स्कुलबस रस्त्यावरून घसरून बाजूच्या शेतात पलटी झाली. या अपघातात दहा ते बारा विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना खासगी व प्राथमिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थी हे कोतोली येथील के. एस. चौगुले शाळेचे आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील के. एस. चौगुले शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन स्कुलबस वाघवेकडून आळवे पिंपळे गावात आली.

तिथले विद्यार्थी घेऊन हि बस कोतोलीकडे जात होती. दरम्यान, या मार्गावर रस्त्याचा कडेला जाऊन हि बस बाजूला शेतात जाऊन पलटी झाली. या अपघातात दहा- ते बारा विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. हि घटना वाऱ्यासारखी गावात पसरली. हि घटना समजल्यानंतर पालकांनी शाळेत व रुग्णालयात गर्दी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -