Thursday, July 31, 2025
Homeब्रेकिंगरेशन कार्डधारकांना दरवर्षी मिळणार मोफत LPG सिलिंडर

रेशन कार्डधारकांना दरवर्षी मिळणार मोफत LPG सिलिंडर

वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी आहे. आता तुम्हाला एका वर्षात 3 गॅस सिलिंडर मोफत मिळण्याची संधी आहे. शिधापत्रिकाधारकांना आधी मोफत रेशन आणि आता मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. तुम्हाला त्याचा फायदा कसा मिळेल ते जाणून घ्या.

शिधापत्रिकाधारकांना मोफत गॅस सिलिंडर तुम्ही अंत्योदय कार्डचे लाभार्थी असाल तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आता सरकारकडून तुम्हाला मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. पुष्कर सिंह धामी सरकारने दिलेल्या माहितीनुसार, शिधापत्रिकाधारकांना वर्षाला तीन एलपीजी सिलिंडर मोफत दिले जातील. यामुळे सरकारवर आर्थिक बोजा वाढणार असला तरी त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. या घोषणेसोबतच त्यात काही अटी आणि शर्तीही आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्हाला सिलिंडर मिळू शकेल.

जाणून घ्या या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

सरकारच्या मोफत तीन गॅस सिलिंडरच्या लाभासाठी काही अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. लाभार्थी उत्तराखंडचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. यासाठी अंत्योदय शिधापत्रिकाधारकांचे गॅस कनेक्शन कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.

हे काम या महिन्यात करा तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये तुमचे अंत्योदय लिंक करुन घ्या. जर तुम्ही या दोन्ही लिंक जो नाहीत तर तुम्ही सरकारच्या मोफत गॅस सिलिंडरच्या योजनेपासून वंचित राहाल. सरकारने तयारी पूर्ण केली आहे. याअंतर्गत जिल्हानिहाय अंत्योदय ग्राहकांची यादीही स्थानिक गॅस एजन्सींना पाठवण्यात आली आहे. अंत्योदय कार्डधारकांच्या शिधापत्रिकाधारकांना गॅस कनेक्शन लिंक करण्यास सांगण्यात आले आहे. उत्तराखंड सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील सुमारे 2 लाख अंत्योदय कार्डधारकांना मोठा फायदा होणार असून, या योजनेतून सरकारला एकूण 55 कोटी रुपयांचा बोजा सहन करावा लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -