Tuesday, July 29, 2025
Homeतंत्रज्ञानसावधान…!! ‘व्हॉटस अ‍ॅप’ वापरताना ‘ही’ चूक करु नका..

सावधान…!! ‘व्हॉटस अ‍ॅप’ वापरताना ‘ही’ चूक करु नका..

स्मार्टफोन हातात आल्यापासून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.. त्यातही जगभरात सर्वाधिक युजर्स ‘व्हॉटस अ‍ॅप’चे असल्याचे दिसते.. व्हॉटस अ‍ॅपची ही लोकप्रियता ‘कॅश’ करुन अनेकांना लोकांना गंडा घालण्यास सुरुवात केली आहे.. त्यासाठी व्हॉटस अ‍ॅप सारखेच दिसणारे बनावट ‘अ‍ॅप’ तयार केले आहेत..

‘व्हॉटस अ‍ॅप’ (Whatsapp) या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपचे ‘सीईओ’ विल कॅथकार्ट यांनी ट्विट करुन भारतीय युजर्संना सतर्कतेचा इशारा दिला आहे.. ‘व्हॉटस अ‍ॅप’च्या बनावट आवृत्त्यांपासून सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

‘व्हॉटस अ‍ॅप’च्या सिक्युरिटी रिसर्च टीमला काही बनावट ‘अ‍ॅप’ सापडले आहेत. ‘HeyMods’ नावाच्या डेव्हलपरचे ‘Hey WhatsApp’ सारखे अ‍ॅप धोकादायक आहेत. भारतीय लोकांनी ते ‘डाउनलोड’ करु नये. अशा बनावट अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्सचा डेटा चोरी होण्याची शक्यता असल्याचे ‘व्हॉटस अ‍ॅप’कडून सांगण्यात आलं आहे..

युजर्सची सुरक्षा धोक्यात

स्मार्टफोनमधील हे बनावट अ‍ॅपही ‘व्हॉटस अ‍ॅप’ सारख्याच सेवा देतात.. मात्र, त्यांच्याकडे युजर्सच्या सुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेतली जात नाही.. किंबहूना या ‘अ‍ॅप’कडूनच युजर्सच्या ‘डेटा’चा गैरवापर होऊ शकतो.. हे बनावट ‘अ‍ॅप’ युजर्सच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करीत नसल्याचे ‘व्हॉटस अ‍ॅप’चे ‘सीईओ’ विल कॅथकार्ट यांनी म्हटले आहे..

सध्या तरी ‘व्हॉटस अ‍ॅप’ची नवीन बनावट आवृत्ती ‘गुगल प्ले-स्टोअर'(Google play store)वर उपलब्ध नाही, परंतु काही युजर्स अनधिकृत स्रोत वापरुन असे बनावट ‘अ‍ॅप’ डाउनलोड करतात. असे ‘अ‍ॅप’ डाउनलोड करण्याआधी सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे. शक्यतो कंपनीच्या वेबसाइटवरून किंवा ‘गुगल प्ले स्टोअर’वरुनच ‘व्हॉटस अ‍ॅप’ची अधिकृत आवृत्ती डाउनलोड करावी, असा सल्लाही कॅथकार्ट यांनी दिला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -