सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊ लागली असून पंचगंगा नदीची पाणी पातळी ३४ फूट ४ इंचावर पोहोचली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला पुराचा(flood) धोका वाढला असून नदीकाठच्या व पूरबाधित गावांतील नागरिकांनी स्थलांतरणसाठी तयार राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत.
पावसाचा जोर वाढला असल्याने नद्याच्या पाणी पातळीत हळू-हळू वाढ होऊ लागली आहे, या परिस्थितीत एखादा मोठा पाऊस झाल्यास पूराची परिस्थिती गंभीर बनू शकते, या पार्श्वभूमीवर पूरबाधित नागरिकांनी आपले जीवनावश्यक सामान बांधून घ्यावे, तसेच आपले घरगुती सामान अन्यत्र अथवा उंचावर ठेवावे, औषधे, आवश्यक गोष्टी बरोबरच घेण्यासाठी बांधून ठेवाव्यात, पाणी चढू लागल्यास प्रशासनाच्या सूचनानुसार स्थलांतरीत व्हावे लागेल, यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे. पुराचा(flood) संभाव्य धोका लक्षात घेऊन पूरबाधित गांवातील नागरिकांसाठी बचाव व मदत कार्याची यंत्रणा सज्ज असल्याचेही ते म्हणाले. गेल्या आठवडाभरापासून राधानगरी धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने धरणामध्ये ३३२.३५ दलघमी झाला असून सद्या धरण ५५.८९ टक्के भरले आहे. धरणातून १३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सरू आहे.
धरणातून १३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणातून १३५० क्युसेक विसर्ग गेल्या आठवडाभरापासून राधानगरी धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने धरणामध्ये ३२७.३५ द.मी पाणीसाठा झाला असून सद्या धरण ५५.८९ टक्के भरले आहे. सद्या राधानगरी धरणातून १३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून वारणेतून ८०७, दुधगंगा ७००, कासारी २५०, कडवी १४०, कुंभी ३००, पाटगांव २५०, घटप्रभा ४७६५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधाऱ्यांची पातळी गेली ३४.४ फुटावर पावसाची संततधार सुरुच राहिल्याने कोल्हापूरातील राजाराम बंधाऱ्यांची पाणी पातळी गेली ३४ फूट ४ इंचावर तसेच सुर्वे ३२ फूट १०, रुई ६२.०६ फूट, इचलकरंजी ५९.९ फूट, तेरवाड ५२.०३ फूट, शिरोळ ४५ फूट, नृसिंहवाडी ४३ फूट अशी आहे.