Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंगमहागाईचा पुन्हा भडका! गॅस सिलिंडरनंतर आता CNG च्या दरात मोठी वाढ

महागाईचा पुन्हा भडका! गॅस सिलिंडरनंतर आता CNG च्या दरात मोठी वाढ

पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) गेल्या दोन महिन्यांपासून स्थीर आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, आता सरकारने आता सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) दरात मोठी वाढ केली आहे. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 4 रुपये तर पीएनजीच्या दरात प्रतिकिलो 3 रुपयांनी वाढ केली आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्यात येणार आहे.गेल्या आठवड्यात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात (LPG Gas Cylinder) 50 रुपयांनी वाढ झाली होती.

सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती महानगर गॅस लिमिटेडकडून देण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 4 रुपये तर पीएनजीच्या दरात प्रतिकिलो 3 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे सीएनजी 80 रुपये प्रतिकिलो तर पीएनजी 48 रुपये 50 पैसे प्रतिकिलो झाला आहे. या दरवाढीचा फटका वाहनचालकांना बसणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.या दरवाढीमुळे महिलांच्या किचनचं बजेट कोलमडले आहे. कारण 14.5 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलिंडरसाठी 1 हजार 53 रुपये मोजावे लागत आहे. त्याचबरोबर 5 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किंमतीत 18 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यातच 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 3.5 रुपयांनी वाढली होती. एका सिलिंडरची किंमत 1,003 रुपये झाली होती. त्याआधी एलपीजी सिलिंडरची किंमत 999.50 रुपये होती. महिन्याभराआधीच सिलिंडरच्या किमतींनी एक हजार रुपायांच्या आकडा पार केला होता. त्यानंतर आता थेट 50 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे गृहिणिंच्या बजेटवर मोठा परिणाम होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -