नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. रेल्वे रिक्रूटमेंट सेल, पश्चिम मध्य रेल्वे (WCR)मध्ये विविध पदांसाठी (नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी) नोकर भरती प्रक्रिया सुरु आहे.. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे..
पश्चिम मध्य रेल्वेमध्ये होणाऱ्या या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या
एकूण पदे – 121
पदनिहाय रिक्त जागा
- स्टेशन मास्टर- 8
- वरिष्ठ कमर्शियल कम तिकीट लिपिक – 38
- वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक – 9
- कमर्शियल कम तिकीट क्लर्क – 30
- लेखा लिपिक सह टंकलेखक – 8
- कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक – 28
पात्रता
- ‘स्टेशन मास्टर’, ‘स्टेशन कमर्शियल कम तिकीट’ व ‘वरिष्ठ लिपिक कम टायपिस्ट’ या पदांसाठी उमेदवार पदवीधर असणे अनिवार्य आहे.
- ‘कमर्शियल कम तिकीट क्लर्क’, ‘अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट’ आणि ‘ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट’ या पदांसाठी बारावी पास उमेदवार अर्ज करु शकतात.
वयोमर्यादा
- सामान्य -18 ते 42 वर्षे
- OBC – 18 ते 45 वर्षे.
- SC/ST – 18 ते 47 वर्षे.
दरमहा पगार
- स्टेशन मास्तर – 35,400 रुपये
- वरिष्ठ कमर्शियल कम तिकीट लिपिक – 29,200 रुपये
- वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक – 29,200 रुपये
- कमर्शियल कम तिकीट क्लर्क – 21,700 रुपये
- लेखा लिपिक सह टंकलेखक – 19000 रुपये
- कनिष्ठ लिपिक सह टायपिस्ट – 19000 रुपये
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 28 जुलै 2022
असा करा अर्ज
- सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट wcr.indianrailways.gov.in वर जावे
- ‘GDCE अधिसूचना क्रमांक 01/2022’च्या लिंकवर क्लिक करा
- नंतर नवीन नोंदणीच्या लिंकवर क्लिक करा.
- आता विनंती केलेली माहिती सबमिट करून नोंदणी करा.
- फोटो व सही अपलोड करा, अर्ज फी भरा.
- सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.