Friday, June 27, 2025
Homeसांगलीसांगली: येथे किरकोळ कारणावरून तरुणाचा खून

सांगली: येथे किरकोळ कारणावरून तरुणाचा खून

ताजी बातमी ऑनलाईन टीम

तासगाव; मणेराजुरी (ता. तासगाव) येथे किरकोळ कारणावरून साहेबराव चंद्रकांत शिदगणेश (वय 37) या तरुणाचा कु-हाड, कोयता व चाकूने वार करून खून करण्यात आला. खुनाचा प्रकार शुक्रवारी रात्री उशिरा घडला आहे. याबाबत साहेबराव याची आई सरुबाई चंद्रकांत शिदगणेश (वय 60) यांनी तासगाव पोलिसात चौघांविरोधात फिर्याद दिली आहे.



गुन्हा दाखल झालेल्यात रोहन्या ऊर्फ दिनेश अनिल माने, बापूसो ऊर्फ बाजीराव बन्सीलाल चव्हाण, दादासो अशोक कांबळे व लखन कांबळे (सर्व रा. मणेराजुरी) याचा समावेश आहे. या प्रकरणी रोहन्या माने, दादासो अशोक कांबळे व बापूसो चव्हाण (सर्व रा, मणेराजुरी) तिघांना पोलिसानी ताब्यात घेतले आहे. यातील चौथा संशयित लखन कांबळे हा फरार आहे.


या बाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी : मयत साहेबराव आणि संशयित लखन कांबळे यांच्यात शुक्रवारी सायंकाळी मणेराजुरी बस स्थानक चौकात जोरदार बाचाबाची झाली होती.या वेळी काहींनी मध्यस्थी करून त्यांना घरी जाण्यास सांगितले होते. मात्र या वेळी संशयितांनी बघून घेण्याची धमकी दिली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -