Saturday, October 12, 2024
Homeअध्यात्मतुळशीच्या झाडाखाली उगवलेले हे रोप लगेच तोडा : तुमचा भाग्योदय होईल

तुळशीच्या झाडाखाली उगवलेले हे रोप लगेच तोडा : तुमचा भाग्योदय होईल


नमस्कार मित्र -मैत्रिणींनो

मित्र -मैत्रिणींनो आपल्या तुळशीच्या झाडा खाली उगवलेले हे रोप लगेच तोडा तुमचा भाग्योदय होईल.

मित्र -मैत्रिणींनो यासाठी काय करावे लागणार आहे तो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो साधा सोपा व अत्यंत गुणकारी आहे. त्याचबरोबर प्रचंड फायदा करून देणारा हा उपाय आहे. आपले घर धन धान्याने भरून जाणार आहे.

माता भगवतीचा आपण घट घालतो त्यामध्ये काही आपण जे बोलतो ते बीज अंकुरित होऊन वर येते त्यावेळी माता भगवती रूप म्हणून त्याची आपण मनोभावे प्रार्थना करतो.

माता भगवतीचे वास्तव्य त्या घटाच्या अवतीभवती पसरते व तेथील जागा पवित्र होते. मित्र -मैत्रिणींनो आपण पाहिलंच आहे. की आपले वाडवडील म्हणतात की तुळशीच्या अवतीभवती कचरा करू नये तुळशीचे वृंदावन नेहमी स्वच्छ असावे.

तुळशी जवळची जागा अस्वच्छ असणे आपण अशुभ मानतो. कारण तुळशीचे पावित्र्याची आभा अवतीभवती पसरलेली असते. तुळशीच्या पिंपळाच्या लिंबाच्या झाडाभोवती कचरा केल्यास आपल्यालाच पाप लागते.

आपल्या देवघरातील जागा देखील स्वच्छ असणे गरजेचे आहे. कारण मंत्रोपचार केल्यामुळे तेथील वातावरण चैतन्यमय होते. त्यामुळे देवघरातील साफसफाई वरचेवर करणे गरजेचे आहे.

ज्यावेळी आपण तुळशीला जल अर्पण करतो दिवा लावतो अगरबत्ती लावतो तेथील वातावरण दैवी शक्तीने परिपूर्ण झालेले असते. आपल्या मनाला देखील आपण आपल्या अवतीभवती देवाचे अस्तित्व अनुभवतो.

त्यावेळी आपल्या मध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपल्या सर्व इच्छा, अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी आपली सकारात्मक इच्छाशक्ती बोलू लागते. देवापर्यंत आपले म्हणणे पोहोचत व आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

मित्र -मैत्रिणींनो जावी आपल्या तुळशीच्या वृंदावनाच्या आजूबाजूला गवताचे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे गवत आल्यास ते आपल्या इच्छा आहेत व त्या इच्छा आपल्या पूर्ण होणार आहेत असे समजावे.

तुळशीजवळ त्या रोपाला हात जोडून विनंती करावी की तुम्ही माझ्यासोबत आमच्या घरात या. आमचे कल्याण करा आमच्या सर्व अडचणी दूर करून आम्हाला सुखी-समाधानी ठेवा.

असे म्हणून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते रोप मुळासकट घेऊन त्याला पाण्याने स्वच्छ धुवावे देवघरामध्ये किंवा पूजेच्या ठिकाणी त्याला ठेवावे.

त्याला हळदी कुंकू लावून त्याची मनोभावे पूजा करावी आपल्या सर्व इच्छा त्याच्याजवळ बोलून दाखवाव्यात व हात जोडून मनापासून प्रार्थना करावी व तुपाचा दिवा तेथे लावा.

मनोभावे पूजा करून झाल्यानंतर त्या रोपाला एका पिवळ्या वस्त्रांमध्ये गुंडाळून आपल्या पर्स मध्ये पाकीट मध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो तेथे ठेवून द्यावे. त्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होणार आहेत.

मित्र -मैत्रिणींनो आपल्याला जर शत्रूंचा त्रास होत असेल तर घराच्या चौकटीला हे रोप आपण बांधू शकतो. चौकटीला बांधण्या आधी पिवळ्या कापडामध्ये आपल्याला हे रोप बांधायचे आहे.

जर आपल्याकडे पिवळे कापड नसेल तर पिवळ्या कागदामध्ये बांधायचा आहे आणि पिवळा कागद पण नसेल तर आपल्याला पांढरा कागद घेऊन त्याला हळदीने पिवळे करून घ्यावे व ते दरवाजावर बांधून ठेवावे.

मित्र -मैत्रिणींनो हा उपाय आपण अवश्य करून पहा ज्याचा लाभ आपल्याला उत्तमच मिळेल. यामुळे आपल्या जीवनामध्ये चांगले परिवर्तन होईल. या उपायाचे निश्चित असे फळ आपल्याला आठवडाभर यामध्येच प्राप्त होईल.

मित्र -मैत्रिणींनो हि माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे.याचा कुणी अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -