ताजी बातमी ऑनलाईन टीम
“काय नाना… तुम्ही पण” म्हणत चित्रा वाघ यांनी ट्वीट केला नाना पटोलेंचा पार्टी व्हिडिओ शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा कार्यकर्त्यासोबत संवाद साधताना “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील” असे म्हणत असल्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल (viral video) झाला होता. त्यांचा हा डायलॉग एवढा गाजला की त्याने अख्खा सोशल मीडिया व्यापून टाकला. त्यांच्या या डायलॉने सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर होऊ लागल्या, अनेक व्हिडिओ बनले आणि मीम्सनी तर धुमाकूळ घातला. एवढच नाही तर विधानसभेत देखील त्यांच्या या डायलॉगची चांगलीच चर्चा झाली. त्याच्या या डायलॉगची क्रेझ अजूनही संपली नाही. आता याच डायलॉगचा वापर करून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर टीका केली आहे.
चित्रा वाघ यांनी नाना पटोले यांचे काही फोटो मिक्स केलेला एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला (Chitra Wagh tweeted Nana Patole’s party video) आहे. या व्हिडिओत मिक्स केलेल्या फोटोंमध्ये नाना पटोले एका हॉटेलमध्ये बसलेले दिसत आहेत. त्यांच्यासोबत एक लेडी पार्टनर देखील दिसत आहे. हेच फोटो वापरून बनवलेला एक व्हिडिओ चित्रा वाघ यांनी ट्वीट केला आहे आणि त्याला “काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीत….” असे कॅप्शन दिले आहे. या ट्वीटमध्ये चित्र वाघ यांनी नाना पटोलेंनाही टॅग केले आहे. चित्रा वाघ यांच्या या ट्वीटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
“काय नाना… तुम्ही पण” म्हणत चित्रा वाघ यांनी ट्वीट केला नाना पटोलेंचा पार्टी व्हिडिओ
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -