Sunday, July 27, 2025
Homeतंत्रज्ञानसोशल मीडिया वापरताना ‘हे’ नियम पाळावे लागणार, अन्यथा होऊ शकते कारवाई..

सोशल मीडिया वापरताना ‘हे’ नियम पाळावे लागणार, अन्यथा होऊ शकते कारवाई..

सध्याच्या डिजिटल युगात आपण अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आपली दैनंदिन दिनचर्या मित्र-मैत्रिणींना आणि शेअर करत असतो. यातून अनेक जणांसोबत फ्रॉड होत असतो किंवा काही फसवणुकीला बळी पडतात. याशिवाय राजकारण असो कि विशिष्ट समाजात तेढ पसरवणारे कृत्य हे सोशल मीडियाद्वारे व्हायरल करणे किंवा पसरवणे यामुळे लोकांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतं. अलीकडच्या काही काळात केंद्र सरकारने अशा अनेक गोष्टींमुळे या प्लॅटफॉर्म्सवर अनेक मर्यादा आणल्या आहेत.

आयटी नियमांच्या नवीन सुधारणांमुळे भारतात सर्वोच्च सोशल मीडिया (Social media) माध्यम आहेत, ज्याचा वापर देशातील एक लाखो-करोडोंचा मोठा समूह करतो. अशा आपल्याला परिचित असणाऱ्या मेटा, ट्विटर, इंस्टाग्राम, स्नॅपचॅटवर बंधने येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून आयटी कायद्यांमध्ये (New IT rules) काही सुधारणा घडून आणल्या जात आहेत.

आयटी मंत्रालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवे नियम लवकरच अंमलात येण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार, आता सुधारीत आयटी नियम लागू झाल्यानंतर जर सरकारला एखाद्या वापरकर्त्याचे खाते वादग्रस्त वाटत असेल किंवा त्यामुळे जर समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असेल तर असे खाते तातडीने काढून टाकण्याचे आदेश सरकार सोशल मिडीया साईटला देऊ शकते. तसेच ते खाते तात्काळ हटवले जाणे अपेक्षित आहे.

एखाद्या सोशल मीडिया साईटवर एखादी पोस्ट, फोटो टाकला असेल आणि तो वादग्रस्त असेल तर तो तात्काळ हटवण्याची जबाबदारी ही संबंधित सोशल साईटची असणार आहे. याचा सर्वाधिक फटका हा फेसबुक (Facebook), गुगल, इंस्टाग्राम यासारख्या सोशल साईटला बसणार आहे. सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमुळे आपण अनेकदा वाद निर्माण झाल्याचे पहातो. समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी आयटी कायद्यात लवकरच काही सुधारणा केल्या जाणार आहेत.

दरम्यान असं कधी कधी होते कि अनेकदा आदेश देऊन देखील एखादा वादग्रस्त मजकूर सोशल मीडिया (Social Media) साईटवरून हटवण्यास नकार दिला जातो किंवा असे फोटो, व्हिडीओ एखादी व्यक्ती वारंवार टाकत असेल तर अशा व्यक्ती किंवा कंपन्यांविरोधात कठोर कारवाईची आवश्यकता असल्याचा विचार पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आयटी कायद्यांमध्ये काही सुधारणा घडून आणण्यात येणार आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका हा प्रमुख सोशल मीडिया साईट असलेल्या फेसबूक, ट्विटर, इस्टाग्राम आणि गुगल सारख्या माध्यमांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -