जिल्ह्यातील दोन्ही खासदार शिंदे गटात गेले आहेत. त्यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरावे. (kolhapur local news) कोल्हापूरची स्वाभिमानी जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले.
खासदार संजय मंडलिक यांनी उद्धव ठाकरे यांना फसवले आहे. कोल्हापूरकरांचा विश्वासघात केला आहे. धैर्यशील माने यांचा प्रवासच राष्ट्रवादी, शिवसेना वगैरे असा झाला आहे. (kolhapur local news) पक्षाशी एकनिष्ठ न राहण्याचा त्यांचा इतिहास आहे; पण आमच्या सोबत राहून गद्दारांना धडा शिकवण्याचे प्लॅनिंग करत होते, तेच संजय मंडलिक बंडखोर गटाला जाऊन मिळाले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी अशा गद्दारांवर विश्वास टाकू नये. परत पक्षात स्थान देऊ नये, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.