भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची वनडे सीरिज जुलै म्हणजे आजपासून सुरू होत आहे. यानंतर 29 जुलैपासून 5 सामन्यांची टी-20 सीरिज खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुलला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे केएल राहुल टी-20 सीरिजमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत माहिती दिली आहे.
22 जुलैपासून सुरु होणाऱ्या वनडे सीरीजसाठी टीम इंडियाच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर टी-20 सीरिजसाठी अनेक खेळाडू टीममध्ये परतणार आहेत. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. केएल राहुलही दुखापतीनंतर टीम इंडियात पुनरागमन करत आहे. आयपीएलनंतर तो जखमी झाला होता. पण अशातच केएल राहुलला कोरोनाची लागण झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. सौरव गांगुली यांनी बोर्डाच्या बैठकीनंतर केएल राहुलला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यापूर्वी KL Rahul कोरोना पॉझिटिव्ह, T-20 सीरिजमधून बाहेर!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -