ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. शिंदे आणि फडणवीसांच्या दिल्लीवारीत गेल्या दोन आठवड्यांपेक्षा अधिक काल रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर आज शिक्कामोर्तब होणार असल्याचं सांगितलं जात आहेत शिंदे आणि फडणवीस आज भाजप श्रेष्ठींशी चर्चा करतील. त्यात खातेवाटप आणि सर्वोच्च न्यायालयातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर चर्चा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सत्कार समारंभ आणि स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला शिंदे आणि फडणवीस हजेरी लावणार असल्याची माहिती मिळतेय.
24 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार – सूत्र
राष्टपती निवडणुकीनंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असंही सांगितलं जात होतं. 19 आणि 20 जुलै अशी तारीखही देण्यात येत होती. मात्र, अद्याप विस्तार झालेला नाही. अशावेळी आता मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीखही सांगितली जात आहे. 24 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी जोरदार चर्चा
सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
शिंदे, फडणवीसांमध्ये खातेवाटपाचं सूत्र काय?
खातेवाटपात कुणाचं पारडं जड राहणार अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, शिंदे आणि फडणवीस यांच्यात खातेवाटपाचं सूत्र ठरलं असल्याचं सांगितलं जात आहे. दर चार आमदारांमागे एक मंत्रिपद निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. त्यानुसार शिंदे गटाला 14 ते 15 तर भाजपच्या वाट्याला 26 ते 27 मंत्रिपद येतील.