ताजी बातमी ऑनलाईन टीम
६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शुक्रवारी (दि. २२ जुलै) घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटास सर्वात लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला. तर याच चित्रपटात तान्हाजी ही मुख्य भूमिका साकारणाया अजय देवगण याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुस्कार जाहीर झाला.
तान्हाजीच्या निमित्ताने बॉलिवूडच्या सिंघमने पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कारास गवसणी घातली. अनेक दिवसांनी या चित्रपटाद्वारे अजयने पुन्हा एकदा आपले स्टारडम आणि अभिनयातली कौशल्य अबाधित असल्याचे दाखवून दिले आहे…