पश्चिम बंगालमधील शिक्षण भरती घोटाळा प्रकरणामध्ये सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून (ED) कसून तपास सुरु आहे. याप्ररकरणी अटक करण्यात आलेले माजी शिक्षण आणि संसदीय कामकाज मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या दुसऱ्या घरावर ईडीने छापा टाकत 20 कोटींची रक्कम जप्त केली होती. या कारवाईनंतर ईडीला पुन्हा अर्पिता मुखर्जीच्या आणखी एका घरामध्ये पैसे लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ईडीने अर्पिता यांच्या दुसऱ्या घरावर छापेमारी करत तब्बल 30 कोटींची रोकड जप्त केली होती. त्याचसोबत या कारवाईत ईडीने तब्बल 3 किलो सोनं देखील जप्त केले आहे. आधीच्या कारवाईमध्ये देखील ईडीने ढिगाने पैसा जप्त केला होता या कारवाईमध्ये देखील ईडीला पैसे घेऊन जाण्यासाठी ट्रक मागवावे लागले.
अर्पिता मुखर्जी सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. ईडीने गुरुवारी अर्पिता मुखर्जी यांच्या क्लब टाऊनमधील अपार्टमेंटवर छापेमारी केली. या कारवाईत ईडीने 20 कोटी रुपये, सोन्याचे दागिने, सोन्याच्या विटा, संपत्तीसंदर्भातील करारपत्रे जप्त केली आहे. ईडीने आतापर्यंत अर्पिता मुखर्जी यांच्या दोन घरांवर छापेमारी केली. या कारवाईत ईडीने तब्बल 45 कोटींची रक्कम जप्त केली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्वाचे म्हणजे अर्पिता यांच्या घरातून परदेशी चलनासह 20 पेक्षा अधिक फोन आणि अनेक कंपन्यांचे कागदपत्रं देखील जप्त करण्यात आले आहे.
ED Raid पैशांचा ढिग! अर्पिता मुखर्जीच्या घरात सापडलं आणखी घबाड, 20 कोटींची रक्कम आणि 3 किलो सोनं जप्त
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -