Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रबीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला गळती; धनंजय मुंडे समर्थक सुषमा अंधारेंचा शिवसेनेत प्रवेश

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला गळती; धनंजय मुंडे समर्थक सुषमा अंधारेंचा शिवसेनेत प्रवेश

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गेल्या दोन महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात प्रचंड वेगाने घटना घडत आहेत. सेनेतील फुटीचे लोण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही येते की काय? असा प्रश्न उपस्थित होत असून बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला गळती लागण्यास सुरुवात झाली आहे. परळी मतदार संघातील राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे समर्थक महिला पदाधिकारी सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले.



सुषमा अंधारे प्रचंड आक्रमक आणि अॅक्टिव्ह असलेल्या महिला पदाधिकारी आहेत. समाजमाध्यमात त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. विशेष करून त्यांची रोख ठोक शैलीतील भाषणे युट्युबवर प्रचंड व्हायरल होतात. परळीतील सक्रिय महिला पद्धधिकाऱ्याने राष्ट्रवादीची साथ सोडल्याने, हा धनंजय मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -