अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणविरोधात थेट मैदानात उतरले आहेत. इराणच्या नाैदलाला टार्गेट करत मोठे हल्ले करण्यात आले. त्यांच्या युद्धनाैका अमेरिकेने बुडून टाकल्या आहेत. हेच नाही तर यादरम्यान बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ही छोटीशी कारवाई असल्याचेही म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता नुकताच मोठा दावा केला. अमेरिकन सैन्य आणि इस्रायली हवाई दल तेहरानमधील प्रमुख इराणी टार्गेटवर बॉम्बहल्ला करत आहे. इराण कारवाई करत अमेरिकेच्या लष्कर तळांवर हल्ला करत आहे. आखाती देशातील अमेरिकेचे लष्कर तळ जवळपास उद्ववस्थ झाली आहेत. इराणकडून साैदी अरेबियातील तेल रिफायनरीवर हल्ला करण्यात आला, ज्यात मोठे नुकसान झाले. इराणच्या निशाण्यावर दुबईचे विमानतळ आहे. पुन्हा इराणकडून मोठा हल्ला दुबईच्या विमानतळावर करण्यात आला. यादरम्यानच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आम्हाला युद्ध सुरू होण्यापूर्वीच अंदाज होता की, तेलाच्या किंमतींमध्ये वाढ होईल आणि त्या वाढल्या. त्या कमी देखील होतील. जशा तेलाच्या किंमती झपाट्याने वाढल्या तशाच त्या झपाट्याने कमी देखील होतील. आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरून एक मोठा कॅन्सर नष्ट करू… आम्ही कॅन्सरला त्याच्या मुळांसह उपटून टाकणार आहोत.
यावेळी हमासवरील हल्ल्याचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, 7 ऑक्टोबर 2023 विसरू नका. मागील काही वर्षात घडलेल्या गोष्टीही विसरू नका. काय होते ते नक्की पाहूया. इराणी राजवटीवरील हल्ल्याचे समर्थन करताना ट्रम्प म्हणाले की,आम्ही जे करत आहोत ते केवळ आमच्या देशासाठी नाही तर इस्त्रायलसाठी नाही तर किंवा मध्य पूर्वेसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी करत आहोत.
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धादरम्यान पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढलेल्या तेलाच्या किंमतीवर भाष्य केले. या युद्धाचा फटका सर्वच देशांना बसला आहे. तेलाच्या किंमती गगणाला पोहोचल्या आहेत, आणि महागाईचा फटका संपूर्ण जगाला बसताना दिसत आहे. गॅसची मोठी समस्या निर्माण झाली आहे.





