सुरक्षित कम्युनिकेशनमुळे (Secure Communication) व्हॉट्सअॅपवर चॅटिंग (Whatsapp Chatting ) आजकाल जगात सामान्य झाले आहे. व्हॉट्सअॅपला मोबाईल युजर्सकडून (Mobile Users) खूप चांगली पसंती मिळत आहे. चॅटिंग दरम्यान अनेक लोकं त्यांचे व्यावसायिक तसेच खासगी गोष्टींवर चर्चा करतात. पण जर तुमचे सर्व व्हॉट्सअॅप चॅटिंग कोणाच्या हाती लागण्यास सुरुवात झाली तर? असे कसे होऊ शकते असे तुम्हाला वाटत असेल पण हे असे होऊ शकते. कोणाच्याही हाताला आपले व्हॉट्सअॅप चॅट (Whatsapp Chat) लागू शकते. तुम्हाला कदाचित माहीत नसेल की तुमच्या मोबाईल फोनमध्येही याचे फीचर देण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला तुमचे सुरक्षित चॅटिंग कसे लीक (Whatsapp Chatting Leek) होऊ शकते आणि तुम्ही ते लीक होण्यापासून कसे रोखू शकता याबद्दल सांगणार आहोत…
थोडासा निष्काळजीपणा पडेल महागात
सध्या भारतात सुमारे 48 कोटी लोक व्हॉट्सअॅपचा वापर करत आहेत. या अॅपचा वापर वाढण्यामागचे कारण म्हणजे त्याची सुरक्षितता मानली जाते. तुमचा एक छोटासा निष्काळजीपणा कोणालाही या सुरक्षेत अडथळा आणण्याची संधी देऊ शकतो. यासाठी फक्त एक छोटी ट्रिक तुम्हाला वापरावी लागेल. व्हॉट्सअॅप वेब असे या ट्रिकचे नाव आहे. व्हॉट्सअॅप वेबची सुविधा सर्व फोनच्या व्हॉट्सअॅपमध्ये देण्यात आली आहे. म्हणजेच हे फीचर वापरून तुम्ही 4 डिव्हाइसवर एकच व्हॉट्सअॅप अकाऊंट वापरू शकता.
4 डिव्हाइसवर व्हॉट्सअॅप वापरु शकता
तुम्ही ऑफिसमध्ये लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर काम करता आणि तुम्हाला वारंवार व्हॉट्सअॅप चॅटिंगची आवश्यकता असते त्यावेळी तुम्ही व्हॉट्सअॅप वेबचा वापर करुन हे काम सोपे करु शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर जाऊन गुगलमध्ये व्हॉट्सअॅप वेब टाईप करावे लागेल. यानंतर तुम्ही व्हॉट्सअॅप वेबवर आल्यावर तुम्हाला एक स्कॅन कोड दिसेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या फोनच्या व्हॉट्सअॅप अकाउंटवर जा आणि वरच्या उजव्या बाजूला असलेल्या सेटिंगमध्ये जाऊन तिथे तुम्हाला Linked Devices लिहिलेले दिसेल.
तुमचे चॅटिंग लीक होऊ शकते
तुम्ही Linked Devices वर क्लिक केल्यास कॅमेरा उघडेल. यानंतर तुम्ही त्या कॅमेर्याने लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर दाखवलेला कोड स्कॅन कराल. ते स्कॅन होताच तुमच्या मोबाईल फोनमध्ये तसेच तुमच्या लॅपटॉप-डेस्कटॉपवर एकच व्हॉट्सअॅप अकाऊंट सुरु होईल. विशेष म्हणजे एका ठिकाणी तुम्ही जे काही लिहिता किंवा प्राप्त करता, तीच गोष्ट दुसऱ्या ठिकाणीही दाखवली जाईल. अशा परिस्थितीत घरी जाताना जर तुम्ही चुकूनही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वेबवरून लॉग आउट केले नाही तर तुमचे व्हॉट्सअॅप ओपन होईल आणि तुम्ही तुमच्या मोबाइलवर जे काही लिहाल ते डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर बसलेली व्यक्ती वाचत राहील.
शंका आल्यानंतर लगेच करा हे काम
जर तुम्हाला शंका असेल की कोणीतरी तुमचे मेसेज वरील पद्धतीने वाचत तर नाहीना अशावेळी तुम्ही एक ट्रिकचा वापर करुन हे जाणून घेऊ शकता. सर्वात आधी तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप ओपन करावे लागेल. तेथे तुम्हाला तीन डॉट दिसतील. त्या तीन डॉट्सवर क्लिक केल्यावर Linked Devices चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर, तुम्हाला खालील सर्व डिव्हाइसची माहिती मिळेल जिथे तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट सुरु आहे. त्यानंतर तुम्ही त्यावर क्लिक करुन लॉग आऊट करु शकता.