महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता यापुढे एमपीएससीची परीक्षा सीसीटीव्हीच्या देखरेखीत घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. राज्यातील पेपर फुटीची प्रकरणे लक्षात घेता गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आयोगाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे परीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणारा उमेदवार आणि त्याला मदत करणाऱ्यावर कठोर कारवाई होणार आहे.
एमपीएससीने घेतलेल्या निर्णयानुसार, यापुढे सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परीक्षेवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान तसेच परीक्षेनंतरच्या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे कोणत्याही प्रकारचा गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारावर तसेच त्याला मदत करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे गैरप्रकार करताना उमेदवार आढळला तर त्याची उमेदवारी रद्द करण्यासह संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार फौजदारी कारवाईही केली जाणार असल्याचे आयोगाने सांगितले. त्याचप्रमाणए परीक्षेकरिता नियुक्त कर्मचारी आणि आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यावर देखील उमेदवारांवर कारवाई करण्यात येणार आहे.
MPSC Exam : यापुढे MPSC ची परीक्षा सीसीटीव्हीच्या देखरेखीत होणार, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आयोगाचा निर्णय!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -