ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यात शिवसेनेने बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या (BJP) मदतीने सरकार स्थापन केलं आहे. सरकार स्थापन होऊन एक महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तार भिजत घोंगड्यात पडला आहे. परंतु शिंदे गट आणि भाजपमध्ये मंत्रिपद वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात गोपनीय बैठक झाल्याचे देखील समजते. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
20 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. सरकार स्थापण होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा अद्याप विचार झालेला नाही. केवळ दोन मंत्र्यांच्या कॅबिनेटवर महाराष्ट्र सरकारचा गाडा पुढे सरकरत आहे. मात्र, आता शिंदे गट आणि भाजपमध्ये मंत्रिपद वाटपावरून एकमत झाल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. शिंदे गट आणि भाजपमध्ये 65-35 चा फॉर्म्युला ठरला आहे. परंतु त्यावर एकनाथ शिंदे तयार नसल्याचेही समजते. त्यानंतर अमित शाह यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची गोपनीय बैठक होऊन त्यात ठरलेल्या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याची माहिती मिळाली आहे.तरी देखील सध्या शिंदे गट व भाजप नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ वाटाघाटीचं गुऱ्हाळ सुरूच आहे. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 42 मंत्र्यांचा समावेश करू शकतात. तर सद्या 40 पदे रिक्त आहेत. यापैकी 25 ते 30 हे भाजपला तर उर्वरित 10 ते 15 मंत्रिपदे शिंदे गटाला मिळू शकतात, असेही राजकीय सूत्रांनी आधीच स्पष्ट केले आहे.