Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : 26 प्रभागांत 'ओपन' लढत

कोल्हापूर : 26 प्रभागांत ‘ओपन’ लढत

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षणाची ‘लॉटरी’ फुटली. काही इच्छुकांना आरक्षणामुळे ‘मुरड’ घालावी लागेल. काहींना दुसऱ्या प्रभागाचा ‘शोध’ घ्यावा लागणार आहे. 31 पैकी 26 प्रभाग सर्वसाधारण महिला, पुरुष असे झाल्याने या ठिकाणी ‘ओपन’ रणधुमाळी माजणार आहे. 14 प्रभागांत वेगवेगळ्या प्रवर्गातील प्रत्येकी दोन महिलांना ‘संधी’ मिळाली आहे. 17 प्रभागांतील प्रत्येकी 2 जागा पुरुषांसाठी खुल्या झाल्या आहेत. याठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुकांत ‘चुरस’ निर्माण होण्याची शक्यता आहे.



प्रभाग क्र. 2, 4, 6, 7, 8, 9, 13, 14, 20, 22, 23, 28, 29, 30 यात वेगवेगळ्या दोन प्रवर्गांतील महिलांचे आरक्षण निश्चित झाले आहे. तर प्रभाग क्र. 1, 3, 5, 10, 11, 12, 15, 16, 17, 18, 19, 21, 24, 25, 26, 27, 31 या प्रभागांत प्रत्येकी एका महिलेसाठी आरक्षण पडले आहे. याच प्रभागात वेगवेगळ्या प्रवर्गांतील प्रत्येकी दोन पुरुषांसाठी आरक्षण आहे, परंतु त्याठिकाणी महिलाही उमेदवारी अर्ज भरू शकणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -