Friday, August 1, 2025
Homeक्रीडावेस्ट इंडिजविरुध्द भारताचा विजय, पहिल्या टी-20 सामन्यात रोहित-कार्तिकची दमदार फलंदाजी..

वेस्ट इंडिजविरुध्द भारताचा विजय, पहिल्या टी-20 सामन्यात रोहित-कार्तिकची दमदार फलंदाजी..

भारताने नुकतीच एकदिवसीय मालिका जिंकल्याने भारतीय खेळाडूंचा प्रचंड आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे. कारण काल (ता. 29 जुलै) भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात (West Indies vs India 1st T20I) वेस्ट इंडिजचा 68 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने 44 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 64 धावा, सुर्यकुमार यादवने 24 धावा, रविंद्र जडेजाने 16, रिषभ पंतने 14 धावा, तर अखेरच्या काही षटकांत जेव्हा टीम इंडियाचा डाव फसला तेव्हा दिनेश कार्तिकने दमदार फलंदाजी करत 19 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 41 धावा केल्या आणि भारताला 190 धावापर्यंत पोहोचवले.

वेस्ट इंडिजचा संघ 122 धावांवरच गुंडाळला गेला. अर्शदीप सिंगने कायल मायर्सला 15 धावांवर बाद करत वेस्ट इंडीजला पहिला धक्का दिला. रविंद्र जडेजाने जेसन होल्डरला शुन्यावर बाद केलं, भुवनेश्वर कुमारने शमहर ब्रुक्सला 20 धावांवर बाद केलं, रविचंद्रन अश्विनने निकोलस पूरनला 18 तर रवी बिश्नोईने रोव्हमन पॉवेलला 14 धावांवर बाद केलं, अश्विनने हेटमायरला 14 तर बिश्नोईने ओडेन स्मिथला शुन्यावर बाद केलं. वेस्ट इंडिजला 20 षटकात 8 फलंदाजांच्या मोबदल्यात 122 धावात रोखलं.

वेस्ट इंडिजकडून पदार्पणवीर अल्झारी जोसेफने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच किमो पॉल, ओबेद मॅकॉय, जेसन होल्डर, अकिल हुसेन यांनीही प्रत्येकी एक विकेट काढली. भारताकडून अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. यानंतर टीम इंडियाने हा सामना 68 धावांनी जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -