Tuesday, December 24, 2024
Homeइचलकरंजीराजू शेट्टी यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर विश्वासघातकी म्हणून टीका केली होती...

राजू शेट्टी यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर विश्वासघातकी म्हणून टीका केली होती ; धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर निषेध केला.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर विश्वासघातकी म्हणून टीका केली होती त्या टिकेचा खासदार धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर निषेध केला.



हातकणंगले तालुक्यातील रुकडी खासदार धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केलं होतं. दोन दिवसांपूर्वी माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे इथं पत्रकार परिषदेमध्ये खासदार दर्शनी माने यांच्यावर विश्वासघातकी म्हणून टिका करत केली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये माने यांचा पराभव करू अशी वल्लगना केली होती. राजू शेट्टी यांच्या या वक्तव्याने खासदार दर्शील माने यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी खासदार शेट्टी यांच्या राजकीय प्रवासावर प्रकर टिका केली.

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेट्टी यांनी जातीयवादी पक्षाबरोबर युती केली म्हणून शरद जोशींच्या संघटनेत फूट पाडून स्वतंत्र संघटना स्थापन केली. 2007 साली ऊसाला 1280 रुपये दर मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टी यांनी घातकी सेटलमेंट करून 900 रुपये दरावर सेटलमेंट केली यामध्ये शेतकऱ्यांच्या विश्वासघात केला, शिरोळ दत्त कारखान्यावर शेतकऱ्यांनी ज्यावेळी आंदोलन केलं होतं त्यावेळी 400 कार्यकर्त्यांना प्रचंड मारहाण करत 80 कार्यकर्त्यांच्या वर कोर्टात खटला दाखल केला होता. याच राजू शेट्टी यांनी काही महिन्यापूर्वी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत या कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील त्यांचे पोलिंग एजंट म्हणून काम केले म्हणजे हा विश्वासघात नव्हे का, ज्या भारतीय जनता पार्टीला जातीयवादी पक्ष आहे म्हणून आरोप करून स्वतंत्र शेतकरी संघटना काढणाऱ्या शेट्टींनी पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा पाहून भाजपमध्ये सामील होऊन खासदार झाले.

केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने पुन्हा भाजपची फारकत घेऊन राष्ट्रवादी कांग्रेससी आघाडी केली अशा अनेक ठिकाणी विश्वासघातकी राजकारण करणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नसल्याचा आरोप किरण पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी उपसरपंच रणजीत कदम,किरण पाटील,सत्यजित इंगळे, काशिनाथ शिनगारे,मोहन माने, अनिल बागडी पाटील, शमुवेल लोखंडे,ऍड सुरज पाटील,सचिन इंगळे, ऋतुराज माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -