Saturday, July 5, 2025
HomeसांगलीSangli Jail : सांगलीत कारागृहातून खुनातील संशयित पळाला, पोलिसांनी तातडीने केली नाकाबंदी,...

Sangli Jail : सांगलीत कारागृहातून खुनातील संशयित पळाला, पोलिसांनी तातडीने केली नाकाबंदी, फरार आरोपीचा शोध सुरू

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सांगली : सांगलीच्या तासगाव येथील जेसीबी चालकाच्या खून प्रकरणातील संशयित सुनील ज्ञानेश्वर राठोड हा आज सकाळी कारागृहाच्या भिंतीवरून उडी टाकून पळाला. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली. परंतु, त्याचा ठावठिकाणा समजू शकला नाही. सुनील हा योळगोड येथील राहणारा आहे. सुनील हा र जेसीबी मालक हरी येडुपल पाटील (रा. मंगसुळी) यांच्याकडे चालक म्हणून काम करत होता.


मालक हरी पाटील यांनी संशयित सुनील याची पत्नी पार्वती हिच्या अंगावर हात टाकला होता. त्यामुळे सुनील त्यांच्यावर चिडून होता. सुनील याने त्यांचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानंतर सुनील आणि त्याच्या पत्नीने 8 जून 2021 रोजी जेसीबी मालक हरी पाटील याचा निघृण खून केला. त्यानंतर तासगावजवळ त्याचा मृतदेह विहिरीत टाकला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने याचा तपास करून खुनाचा छडा लावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -